गोमन्तक डिजिटल टीम
आपले डोळे हा शरीराचा सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. अशा परिस्थितीत डोळ्यांची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते.
लहान मुलांपासून तरूणांपर्यंत प्रत्येकाची कामं बहुतांशी मोबाइल, लॅपटॉपवर होतात. अशा परिस्थितीत जास्त स्क्रीन टायमिंग डोळ्यांची दृष्टी खराब करत आहे.
म्हातारी असो की लहान मुलं, सगळ्यांनीच चष्मा घातलेला असतो. हे उपाय केल्याने दृष्टी बरी करू शकते.
व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. पालकामध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे दृष्टी तीक्ष्ण होते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए देखील मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढतो. यासोबतच त्याचा रस प्यायल्याने डोळ्यांचा चष्माही दूर होतो.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए तसेच लोह आणि फायबर असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा रस डोळ्यांसाठी खूप चांगला आहे. ते उकळून देखील खाऊ शकता.
गाजर हे डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांची दृष्टी वाढवते. त्याचा रस प्यायल्याने रातांधळेपणाचा धोकाही कमी होतो.
ब्रोकली हे आरोग्यासोबतच दृष्टीसाठी रामबाण उपाय आहे. त्याचा रस पिल्याने दृष्टी वाढते.