Pranali Kodre
एमएस धोनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.
धोनीची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच होत असते.
नुकताच धोनीचा एक फोटो व्हायरल झाला असून यात त्याचे तगडे बायसेप्स दिसून येत आहेत.
41वर्षीय धोनीचे हे बायसेप्स पाहून चाहत्यांनी त्याच्या तंदुरुस्तीचे कौतुक केले आहे.
तसेही धोनी तंदुरुस्त खेळाडूंमध्ये नेहमीच गणला जातो आणि नेहमीच त्याच्या फिटनेससाठी चर्चेत राहत असतो.
दरम्यान, तगडे बायसेप्स दिसणारा व्हायरल झालेला धोनीचा फोटो चेन्नई सुपर किंग्स संघासह आगामी आयपीएल 2023 हंगामाची तयारी करतानाचा आहे.
सध्या आयपीएल 2023 स्पर्धेसाठी सीएसकेचा संघ चेन्नईत सराव करत आहे.
धोनीने आत्तापर्यंत सीएसकेने खेळलेल्या सर्व आयपीएल हंगामात नेतृत्व केले आहे.
धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेला 4 वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकून दिले आहे.