गोमन्तक डिजिटल टीम
16 जून रोजी नेहा कक्करने धूमधडाक्यात तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. तसेच कुटुंब आणि मित्रांसह वाढदिवसाला खूप मजा केली.
मात्र दरम्यान तिचा पती रोहनप्रीत दिसला नाही. रोहनने सोशल मीडियावर नेहासाठी काही पोस्टही शेअर केली नाही.
यानंतर सर्वत्र त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, ती एक अफवा hoti नेहा आणि रोहनप्रीत यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत.
चित्रांमध्ये नेहा आणि रोहनप्रीत एका जोडप्याप्रमाणे आनंदाने पोज देत आहे. नेहाने शेयर केलेल्या या फोटोत दोघेही खूप रोमॅंटिक दिसत आहेत.
रोहन आणि नेहाचे फोटोही त्यांच्या प्रेमाची साक्ष देत आहेत. त्या दोघांमध्ये कसलेही मतभेद नसल्याचे दिसते.
फोटो शेअर करताना नेहाने लिहिले की, पतीसोबत सुट्टी घालवून शहरात परतलो आहे.
घटस्फोटाच्या अफवांवर नेहा आणि रोहनप्रीत यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता ही शेअर करून त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याचे म्हटले जात आहे.