29 निवडणुका पण एकही पराभव नाही; असा आहे Amit Shah यांचा राजकीय प्रवास...

Akshay Nirmale

अमित शाह हे भारतीय राजकारणातील एक महत्वाचे नेते आहेत. अनेक निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून दिल्यामुळेच ते भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जातात.

Amit Shah | Dainik Gomantak

1989 पासून अमित शाह यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध 29 निवडणुका लढवल्या आणि आजतागायत त्यांना एकही पराभव पत्करावा लागलेला नाही.

Amit Shah | Dainik Gomantak

अमित शाह हे सलग चार वेळा गुजरातच्या सरखेजमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. (1997 पोटनिवडणूक, 1998, 2002 आणि 2007)

Amit Shah | Dainik Gomantak

1982 मध्ये अहमदाबाद RSS च्या कार्यक्रमात अमित शाह यांची नरेंद्र मोदींशी पहिली भेट झाली. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या 12 वर्षांत अमित शाह हे गुजरातमधील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदयास आले.

Amit Shah | Dainik Gomantak

गुजरात सरकारमध्ये त्यांनी गृह, कायदा आणि न्याय, सीमा सुरक्षा, नागरी संरक्षण, उत्पादन शुल्क, वाहतूक, दारूबंदी, विधिमंडळ आणि संसदीय कामकाज अशी खाती हाताळली.

Amit Shah | Dainik Gomantak

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शाह यांनी गुजरातच्या गांधीनगर येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. तेव्हापासून ते केंद्रीय गृहमंत्री आहेत.

Amit Shah | Dainik Gomantak

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्या मायक्रो मॅनेजमेंटमुळेच भाजपला 2014 पेक्षाही मोठा विजय मिळाला. शाह यांनी प्रत्येक ब्लॉकमध्ये मतदारांना संपर्क साधण्यासाठी पन्ना प्रमुख, अर्ध पन्ना प्रमुख नेमले होते.

Amit Shah | Dainik Gomantak

शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014 ते 2016 या कालावधीत महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड आणि आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्या.

Amit Shah | Dainik Gomantak

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अमित शाह यांनी सलग दोन वेळा भाजपचे अध्यक्षपद भुषविले. त्यांच्यानंतर जगत प्रकाश नड्डा हे जानेवारी 2020 मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले.

Amit Shah | Dainik Gomantak
Bollywood Celebrities who have bungalow in Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...