Akshay Nirmale
Austin Russell हे केवळ 28 वर्षांचे असून त्यांनी 800 दशलक्ष डॉलर (सुमारे 6576 कोटी रुपये) मध्ये हा करार केला आहे.
Forbes Global Media Holdings कंपनीचा उर्वरित 18 टक्के हिस्सा फोर्ब्स कुटुंबाच्या मालकीचा असेल.
रसेल हे ल्युमिनार टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ आहेत. तथापि, रसेलची कंपनी फोर्ब्स ब्रँडच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होणार नाही. फोर्ब्स मीडियाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक स्टीव्ह फोर्ब्स हेच मासिक चालवतील.
Luminar Technologies ही एक सुप्रसिद्ध ऑटोमोटिव्ह टेक कंपनी आहे. या कंपनीची मार्केट कॅप 2.1 बिलियन डॉलर इतकी आहे. रसेल यांनी 2012 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी ही कंपनी स्थापन केली होती.
रसेल यांनी फोटोनिक्स आणि ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्सवर काम केलेय. त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे कार, ट्रक अधिक सुरक्षित बनतात. रसेलच्या नावावर अशी 100 हून अधिक पेटंट आहेत.
फोर्ब्स अमेरिकेतील सर्वात जुन्या मीडिया कंपन्यांपैकी एक आहे. जगभरातील ५० लाख लोकांपर्यंत हे मासिक पोहचते.
फोर्ब्स मासिक दरवर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध करते. यासोबतच कंपनी रिअल टाईम अब्जाधीशांची माहितीही देते.