Pranali Kodre
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. ही 9 वी टी20 वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे.
या स्पर्धेसाठी एकूण 20 संघ पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.
या 20 संघांपैकी 15 संघांचे स्थान निश्चित झाले असून अद्याप 5 संघांची जागा रिकामी आहे.
साल 2022 मध्ये टी20 वर्ल्डकपमधील टॉप 8 संघ आणि याव्यतिरिक्त आयसीसी टी20 क्रमवारीतील पहिले 10 संघांमधील राहिलेले 2 संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत.
त्याशिवाय यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका देखील थेट पात्र ठरले आहेत. तर तीन संघ क्वालिफायर राऊंडमधून पात्र ठरले आहेत.
आत्तापर्यंत पात्र ठरलेल्या 15 संघांमध्ये भारत, इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, वेस्ट इंडिज आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे.
आता 5 संघ अमेरिका क्वालिफायर, एशिया क्वालिफायर, अफ्रिका क्वालिफायर या स्पर्धांमधून पात्र ठरणार आहेत.