Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल गेल्या 15 वर्षे क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.
याच आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली होती ती बरोबर 15 वर्षांपूर्वी 18 एप्रिल 2008 रोजी.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात 8 संघ सहभागी झाले होते.
चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स हे 8 संघ पहिल्या हंगामात खेळले होते.
आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिला सामना बंगळुरूला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला होता.
हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघ 140 धावांनी जिंकला होता. विशेष म्हणजे या सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमने 158 धावांची नाबाद खेळी केली होती.
आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद राजस्थान रॉयल्सने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला 3 विकेट्सने पराभूत करत जिंकले होते.
या हंगामानंतर आयपीएलमध्ये अनेक बदल बघायला मिळाले, अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.
पण असे असतानाही आयपीएल प्रत्येकवर्षी लोकप्रियतेची नवनवी उंची गाठत असून 16 व्या वर्षातही यशस्वीपणे स्पर्धा सुरू आहे.