Pranali Kodre
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध १६ एप्रिल २०२३ ला झालेल्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
त्यानंतर त्याने १८ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल कारकिर्दीतील दुसरा सामना खेळला.
हैदराबादविरुद्ध सामना खेळताना अर्जुनने अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद केले.
भुवनेश्वर कुमार अर्जुनची पहिली आयपीएल विकेट ठरला. त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.
खरंतर भुवनेश्वर कुमार पहिला गोलंदाज आहे, ज्याने सचिनला रणजी ट्रॉफीमध्ये शुन्यावर बाद केले होते.
जानेवारी २००९ मध्ये मुंबई विरुद्ध उत्तरप्रदेश संघात झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १९ वर्षांच्या भुवनेश्वरने सचिनला शुन्यावर बाद केले होते.
विशेष गोष्ट अशी की हा रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना देखील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरच झाला होता.
या अंतिम सामन्यानंतर आता तब्बल १४ वर्षांनी अर्जुनने भुवनेश्वरला बाद करत पहिली आयपीएल विकेट घेतली.