गोमन्तक डिजिटल टीम
फळ्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे केसांच्या वाढीस व निरोगी ठेवण्यास मदत करतात. केसांच्या वाढीसाठी तुमच्या आहारात समाविष्ट करा हे फळे
सफरचंद तुमच्या टाळूच्या pH संतुलित ठेवण्यास मदत करू शकते आणि डोक्यातील कोंडा, केस गळणे यासारख्या समस्या दूर करते.
स्ट्रॉबेरी हे केस पातळ होणे आणि केस गळणे थांबवते.
अननस या फळामध्ये व्हिटॅमिन सी हे जीवनसत्वे असते. अननस हे केसांची वाढ होण्यास मदत करते.
पपईमध्ये ए, सी आणि ई हे जीवनसत्त्वे असते, हे टाळूचे आरोग्य सुधारण्यास आणि निरोगी केसांच्या वाढीस मदत करते.
एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई असते जे केसांना पोषण आणि मजबूत करण्यास मदत करतात.
पेरूमधील व्हिटॅमिन सी असते. जे केसांच्या वाढीस मदत करते.
कीवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई जीवनसत्वे असते. त्यामुळे केस गळणे थांबते.
केळी आपल्या पोटॅशियमचे उच्च प्रमाण, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि केसांच्या मुळांना आवश्यक पोषक तत्व पोचवण्यास मदत करते.
डाळिंबात प्युनिकिक ऍसिड असते जे तुमच्या केसांची वाढीस मदत करते.
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे टाळूमध्ये रक्त पुरवठा करण्यास मदत करतात. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.