Kavya Powar
हिवाळ्यात त्वचेसोबत केसांचीही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
या ऋतूमध्ये केस अनेकदा कोरडे, निर्जीव आणि खडबडीत होतात.
हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी केस ट्रिमिंग करणे गरजेचे आहे.
अनेकदा लोक केस सुकवण्यासाठी ड्रायर वापरतात. मात्र तसे केल्याने केस अधिकच कोरडे बनतात.
केस चांगले राहण्यासाठी त्यांना तेल लावणे आवश्यक असते. तसेच हिवाळ्यात तेल लावणे अधिक महत्त्वाचे ठरते.
हिवाळ्यात केसांची डीप कंडिशनिंग खूप गरजेची असते.
हायड्रेटिंग हेअर मास्क लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात.