Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Video

Ramesh Tawadkar: '...तर मी सभापतीपदाचा राजिनामा देईन' तवडकरांचा थेट इशारा

Goa Politics: तवडकर म्हणाले की, फर्मागुढी येथील ‘उटा’च्या महामेळाव्यात सरकार पक्षातील जबाबदार मंत्र्याने माझ्यावर टीका केली. तसेच आरोप करत धमकीही दिली. मी सभापतिपदी असल्याने माझा अवमान हा सभापती पदाचाही अवमान आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ramesh Tawadkar About UTAA Celebrations

मडगाव: ‘उटा’ संघटनेच्या मेळाव्यात आपला म्हणजेच सभापतिपदाचा अवमान केल्याप्रकरणी मंत्र्यांवर सरकारने आणि भाजपने कारवाई केली नाही, तर राजीनामा देण्यासही मागे-पुढे पाहणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी मडगाव येथे पत्रकार परिषदेत दिला.

तवडकर म्हणाले की, फर्मागुढी येथील ‘उटा’च्या महामेळाव्यात सरकार पक्षातील जबाबदार मंत्र्याने माझ्यावर टीका केली. तसेच आरोप करत धमकीही दिली. मी सभापतिपदी असल्याने माझा अवमान हा सभापती पदाचाही अवमान आहे. जर सरकार किंवा पक्षाला मंत्र्यांची ही कृती मान्य असेल आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसेल, तर मी सभापतिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. मी नेहमीच सभापतिपदाची शान राखली आहे. आपल्या जबाबदारीला योग्य न्याय दिला आहे, असेही तवडकर यांनी सांगितले.

मी १९९८ सालापासून आदिवासी समाजाचे प्रश्न आणि समस्या मांडत आलो आहे. पूर्वी ‘गाकुवेध’ संस्था होती, त्यात सुद्धा माझा सहभाग होता. ‘गाकुवेध’चे पहिले अधिवेशन मी काणकोणात आयोजित केले होते. २००५ साली मी आमदार झालो. त्यामुळे समाजासाठी कार्य करण्याचा वेग वाढला. आता जे माझ्यावर आरोप करतात, तेव्हा ते कुठे होते? हा प्रश्र्नदेखील तवडकर यांनी उपस्थित केला. २०१२ ते २०१७ या कालावधीत मी आदिवासी कल्याण मंत्री होतो. मी या समाजासाठीच्या २५ योजना लोकांसमोर मांडल्या. २०१७ ते २०२२ या कालावधीत गोविंद गावडे आदिवासी कल्याण मंत्री आणि प्रकाश वेळीप हे आदिवासी आयोगाचे अध्यक्ष होते. त्या कालावधीत त्यांनी जे काम केले, त्याला मी कधीच आक्षेप घेतला नाही. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयीसाठी बलराम शैक्षणिक संस्था सुरू केली. आदर्श युवक संघामार्फत माझे काम सुरूच आहे. सभापतिपदाचे अधिकार बाजूला सारून मी समाजासाठी कार्य करतो, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT