राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. २०१७ पासून सरकारी विभाग, महामंडळे आणि स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ईपीएफ (EPF) परतावा सरकार करणार आहे. यासाठी शासनावर सुमारे २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असला तरी, तो भार सरकार उचलेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
कॅश-फॉर-जॉब घोटाळ्यातील आरोपी पूजा नाईक हिने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मंत्री निलकांत हळर्णकर यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. या आरोपांबद्दल विचारले असता, त्यांनी "मी या प्रकरणात गुंतलो आहे की नाही, ते तपासा," असे थेट आव्हान दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सदर घोटाळ्याभोवतीचे राजकीय वलय अधिक वाढले असून, या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात स्वयंरोजगार आणि उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. 'ईडीसी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना' (EDC Mukhyamantri Swayam Rozgar Yojana) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे गोव्यातील युवकांना आणि स्टार्टअप्सनाआपला व्यवसाय सुरू करण्यासाठी व वाढवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मोले चेकपोस्टवर आधुनिक पद्धतीची यंत्रणा बसवून सरकार पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाटकर यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, जर सरकारला या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार देता येत नसतील, तर पर्यटकांची होणारी ही 'आधुनीक लूट' त्वरित थांबवावी आणि ती यंत्रणा बंद करावी.
सोमवारपासून माजोर्डा येथून बेपत्ता झालेले तीन अल्पवयीन मुल अखेरीस केरळ राज्यात सुखरूप आढळले आहेत. मुलांचा ताबा घेण्यासाठी कोलवा पोलिसांचे पथक तातडीने केरळकडे रवाना झाले आहे. बेपत्ता झालेल्या एका मुलाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि गोवा बाल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला होता; मात्र, मुले सापडल्याने आता या प्रकरणाला सकारात्मक वळण मिळाले आहे.
दक्षिण गोव्यातील वेर्णा पोलिसांनी एका अत्यंत धक्कादायक घटनेप्रकरणी FIR दाखल केला आहे. 2023 सालापासून सावत्र वडील आपल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. पीडित मुलाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपीवर गोवा बाल कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.