नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री सहभागी नव्हते. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मला आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आणि मी त्या दोघांनाही पैसे दिले, असं पूजा नाईक हिने स्पष्ट केलं आहे.
कळंगुटमधील बागा समुद्रकिनारी फिरणाऱ्या महिला पर्यटकास विनाकारण अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी अतेद्रा सिंग (२३) मूळ राजस्थान याला रितसर अटक केली. अतेद्रा सिंग हा बागा येथे एका खासगी रेस्टॉरंटमध्ये कामाला होता. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने ड्युटीवरील पर्यटक पोलिस शिपायाने अतेद्रा सिंग याला रंगेहाथ पकडले. संशयित कळंगुट पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, परप्रांतीय दलाल तसेच टाऊट्समुळे गोव्याची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत असून पर्यटनाला काळा डाग लागतो आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले आहे.
फोंडा नगराध्यक्षपदी विरेंद्र ढवळीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आनंद नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त होते. सर्वाना बरोबर घेऊन विकास करणार असल्याचे विरेंद्र ढवळीकर यांनी सांगितले.
तिस्क-उसगाव येथील दोन दुकानांत बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरी करून सुमारे दहा हजारांची रोकड पळवली. चोरट्यांनी दुकानाच्या वरती असलेली कौले काढून आत प्रवेश केला व ड्रॉवर फोडून आतील रोकड लंपास केली. सकाळी दुकानमालक दुकान उघडण्यासाठी आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. फोंडा पोलिसांना या चोरीची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
मडगाव पोलिस कोठडीत मारहाण करण्यात आलेल्या एडबर्ग परेरा याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या क्राईम ब्रँचने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे त्या दिवशी कोठडीत काय झाले ते जाणून घेण्यासाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज’ मागितली आहे. ही फुटेज क्राईम ब्रँचकडे सुपुर्द केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एडबर्ग परेरा याला मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असता तिथे त्याला मारहाण झाल्याने गंभीर अवस्थेत गोमेकोत दाखल केले होते. हे प्रकरण सध्या तपासासाठी क्राइम ब्रँचकडे दिले आहे.
बिहारमध्ये झालेल्या ऐतिहासिक आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता सुरू झाली असून प्रारंभीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट आघाडी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्याच्या कलांनूसार मैथिली ठाकूर पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.
मडकई येथे मुख्य रस्त्यावर आज गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका दुचाकीची जोरदार ठोकर बसल्याने रस्ता ओलांडणारी व्यक्ती ठार झाली. त्याचे नाव कृष्णा गावडे (वय ५६) असे असून तो गावणे - मडकई येथील रहिवासी आहे. मडकई आरोग्य केंद्रासमोरच हा अपघात झाला. तो एका खासगी बसवर वाहक म्हणून कामाला होता. घरी परतत असताना त्याला दुचाकीची जोरदार ठोकर बसली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.