Relationship Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Relationship Tips: पती- पत्नीमध्ये पैशांमुळे वाद होत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

पैशांमुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Relationship Tips: पैशांमुळे अनेक नाते जुळतात तर काही नाते तुटतात. पैसा ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा पती-पत्नीच्या नात्यावर देखील परिणाम होतो. दोघेही पैसे कमवत असेल तर वाद अधिक निर्माण होऊ शकतात. सध्या महागाईच्या युगात चांगली आणि आनंदी लाइफस्टाइल हवी असेल तर पैसे कमवण्यासाठी काम करावेच लागते. खर तर छोट्या गोष्टींवरून सुरू झालेले भांडण नातं तुटण्यावर येते. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • कर्ज घेणे

जर तुम्ही दोघे नोकरी करत असाल तर खूप चांगले आहे. घरातील खर्चाचा बोजा दुसर्‍या जोडीदारावर टाकून स्वतःचे पैसे गरज नसलेल्या गोष्टीवर खर्च करून नंतर कर्जाच्या ओझ्याखाली आयुष्य जगण्यापेक्षा तुम्ही पैशांचे उत्तम नियोजन करून तुमचे भविष्य आनंदी आणि सुरक्षित बनवू शकता.

  • पैसे उधार देणे

तुम्ही जर कोणाला पैसे उधार दिले असेल तर याबाबत तुमच्या जोडीदाराला माहिती द्यावी. पैशांबाबतचे व्यवहार जोडीदारासोबत शेअर कराव्या. यामुळे एकमेकांवरचा विश्वास वाढण्यास मदत मिळते.

  • इगो

जर तुम्ही दोघे नोकरी करत असाल आणि तुमच्यापैकी कोणी जास्त कमावत असेल, तर कदाचित तुमच्यात या विषयावर अनेकदा वाद होण्याची शक्यता आहे. तसेच काही वेळा दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थितीमुळे देखील वाद होऊ शकतात. नात्यात वाद नको असेल तर इगोला बाजुला ठेवावे. जर तुम्ही जास्त पैसे कमवत असाल तर घरातील जबाबदारी सांभाळावी.

  • खर्च

प्रत्येकाची स्वतःची लाइफस्टाइल आणि काही सवयी असतात. काही लोकांना पैसे जास्त खर्च न करण्याची सवय असते, तर काहींना स्वतःवर पैसे खर्च करायला आवडते. परंतु जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुम्हाला आयुष्याशी थोडी तडजोड करावी लागते. तुम्हाला जर जास्त खर्च करण्याची सवय असेल तर ब्रेक लावा, अन्यथा जोडीदारासोबत पैशांवरून वाद होऊ शकतात. तुम्हाला आवश्यक वाटेल अशाच गोष्टीवर खर्च करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT