Cooking Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Tips: भातामध्ये पाणी जास्त झाल्यास वापरा 'या' 5 कुकिंग हॅक्स

भातामध्ये पाणी जास्त झाल्यास तुम्ही या ट्रिक्स वापरून शिजवलेल्या भातातील पाणी कमी करू शकता.

Puja Bonkile

Cooking Tips: स्वयंपाक ही एक कला आहे. स्वंयपाक करताना अनेक छोट्या चुका होत असतात. अनेक वेळा भात शिजवताना पाणी जास्त होते.यामुळे भात चिकट होतो आणि त्याची चव देखील खराब होते. अशा वेळी काय करावे हे समजत नसेल तर ही बातमी नक्की वाचा. भातातील पाणी कमी करण्यासाठी तुम्ही या ट्रिक्स वापरू शकता.

  • गॅवर पुन्हा गरम करू शकता

भातात पाणी जास्त झाल्यावर तुम्ही हा उपाय करू शकता. पातेल्यामध्ये भात लावला असेल तर तुम्ही पातेल्यावरचे झाकण काढून गॅसवर मंद आचेवर ठेवावे. यामुळे भातातील लगेच पाणी कमी होते.

  • फ्रिजमध्ये भात ठेवावा

भातातील पाणी कमी करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेऊ शकतात. 20 मिनिटं फ्रिजमध्ये भात ठेवावा. नंतर गॅसवर मंद आचेवर गरम करावे. असे केल्याने भाताचा ओलेपणा कमी होतो.

Cooking
  • पाणी गाळून घ्यावे

भात शिजवतांना अनेक वेळा पाणी जास्त होते. यामुळे भात चिकट होतो. अशा वेळी भातातील पाणी कमी करण्यासाठी तुम्ही पाणी गाळून घेऊ शकता. नंतर मंद आचेवर भात शिजवावा.

  • ओव्हनचा वापर करावा

भातातील पाणी कमी करण्यासाठी तुम्ही ओव्हनचा वापर करू शकता. यासाठी भात 200 डिग्रीवर 10 मिनिट ठेवावे. लगेच भातातील पाणी कमी होईल.

  • टिश्यु पेपरचा वापर करू शकता

भातामधील पाणी कमी करण्यासाठी तुम्ही स्वच्छ कॉटनच्या कापडावर टाकू शकता.

तसेच टिश्यु पेपरचा वापर करून भातातील पाणी कमी करून चिकटपणा कमी होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी रंगणार भारत–पाकिस्तान महामुकाबला! किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Goa Crime: गोव्यात दिवसा चेन स्नॅचिंग… रात्री महाराष्ट्रात पसार! इराणी गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक

Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

राज्यपालपदाच्या प्रवासासाठी राजकीय प्रवासाला सोडचिठ्ठी; पी. अशोक गजपती राजू यांचा तेलगू देसम पक्षाचा राजीनामा

दो भाई दोनों तबाही! मोठ्याने पदार्पणाच्या सामन्यातच विश्वविक्रम रचला, आता धाकट्याने 'हॅटट्रिक' घेत घातला धुमाकूळ; पाहा Video

SCROLL FOR NEXT