Vedanta Mining Dispute Dainik Gomantak
गोवा

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vedanta Mining Dispute: पिळगावमधील शेतकऱ्यांनी तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे तिसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंदच होती. ‘वेदांता’च्या खाणीवरून खनिज वाहतूक धावले नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

Pilgao Farmers Protest Vedanta Mining Dispute

डिचोली: पिळगावमधील शेतकऱ्यांनी तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे तिसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंदच होती. ‘वेदांता’च्या खाणीवरून खनिज वाहतूक धावले नाहीत. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. मागण्या मान्य केल्या, तर कंपनीला सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

आपल्या मागण्या पुढे करुन पिळगावमधील शेतकरी आणि कंपनीने कपात केलेल्या कामगारांनी गेल्या बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे. सारमानस परिसरात खनिज वाहतुकीच्या खाणीवरील रस्त्यावर लाकडी कुंपण आणि झोपडी उभारून ‘रस्ता बंद’ केला आहे. शेतकरी आणि वंचित कामगार मिळून ५० हून अधिक ग्रामस्थांनी आजही आंदोलन केले.

आंदोलनावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. यासाठी पोलिस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

अशी आहे मागणी!

‘वेदांता’कंपनीने कामावरून कमी केलेल्या स्थानिक कामगारांच्या भवितव्याचा विचार करावा. अन्यथा खाण कंपनीने अतिक्रमण केलेल्या शेतजमिनीसह प्रलंबित नुकसान भरपाई द्या. अशी पिळगावमधील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांची शेतीसंदर्भातची समस्या पाच वर्षांच्या आत जाग्यावर घालण्याची तयारी ‘वेदांता’ कंपनीने दर्शवली आहे. मात्र कपात केलेल्या कामगारांच्या प्रश्नावर ठोस निर्णय झालेला नाही. या आंदोलनप्रश्नी आता ‘वेदांता’ कंपनी कोणती भूमिका घेते, आणि हे आंदोलन कधी मिटते. त्याकडे पिळगाववासियांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT