Mapusa Missing Case Update Dainik Gomantak
गोवा

Mapusa Boy Missing Case: ट्रक ड्रायव्हरने दिले 100 रुपये, अभिषेकने सुरत गाठले अन्....; 48 तास, तीन राज्य, 16 वर्षांच्या मुलाची Missing Case Solved

Mapusa Missing Case Update: बुधवारी घराबाहेर पडलेला अभिषेक राजस्थानमध्ये सापडला आहे

Akshata Chhatre

Mapusa Boy Missing Case Update

म्हापसा: खोर्ली, येथील 16 वर्षीय अभिषेक कुमार सिंग नावाचा मुलगा बुधवार (दि. 6 नोव्हेंबर) पासून बेपत्ता होता. बुधवारी संध्याकाळी आईकडून चिप्स खायला पैसे घेऊन घराबाहेर पडलेला अभिषेक पुन्हा घरी परतला नव्हता.

चिंतीत पालकांकडून अभिषेक बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, मात्र आता शनिवारी (दि. 9 नोव्हेंबर) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार अभिषेक सापडला असून तो सध्या राजस्थानमध्ये आहे.

अभिषेक नेमका कोणत्या कारणामुळे बेपत्ता झाला याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र अभिषेकचे वडील नारायणसिंग पुरोहित यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेकला एक ट्रक ड्रायव्हर सापडला आणि त्याने अभिषेकला ढाब्यावर नेऊन खाऊ-पिऊ घातलं आणि केळी घेऊन येण्यासाठी 100 रुपये दिले.

अभिषेकचा मोठा भाऊ गौतम सिंग पुरोहित सांगतो की यानंतर तो ट्रक ड्रायव्हर गायब झाला आणि अभिषेक जवळच असलेल्या सुरत रेल्वे स्थाकावर गेला. ट्रेनमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाला सोशल मीडियावरील बातमीमुळे हा मुलगा अभिषेक असल्याची खात्री पटली आणि त्याने गोव्यात अभिषेकच्या पालकांशी संपर्क केला.

अभिषेक सापडल्याने त्यांचे आई-वडील खुश आहेत आणि त्याच्या बेपत्ता होण्याबद्दल गोव्यातील माध्यमांनी दिलेल्या बातम्यांबद्दल त्यांनी सर्व माध्यमांचे आभार देखील प्रकट केले आहेत. सोबत काही दिवसांतच अभिषेक गोव्यात परत येईल अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT