Cashew crop in Goa Dainik Gomantak
गोवा

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Cashew crop in Goa: विविध पोषक तत्त्वांनी परिपूर्ण ‘काजू’ या कुरकुरीत मेव्‍याचे साऱ्यांनाच आकर्षण असते. काजूच्‍या उपयुक्‍त गुणधर्मामुळे त्‍याला जगभर मोठी मागणी आहे. गोव्‍यातील बहुतांश बागायतदार काजूच्‍या पिकावर अवलंबून आहेत. परंतु, हे पीक घेणे आजघडीला कठीण बनत आहे. काय आहेत त्‍यामागील कारणे? काय उपाय करता येतात? या विषयी आढावा घेण्‍याचा प्रयत्‍न…

गोमन्तक डिजिटल टीम

Soaring Cultivation Costs Climate Change Hit Cashew Production in Goa

वाळपई: सत्तरी तालुक्यात काजू पीक बागायतदारवर्गाचे अत्यंत महत्त्वाचे पीक मानले गेले आहे. सत्तरीतील काजू बियांना वेगळीच चांगली चव आहे. परंतु ही चव कायम टिकवून ठेवायची असेल तर गावठी काजूची लागवड करणे गरजेचे आहे. परंतु आज काजू पीक व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान बनले आहे. व्यवस्थापन करताना काजू बागायतदारांचे कंबरडे मोडत आहे.

काजू हंगाम मार्च ते मे महिन्यापर्यंत असतो. साधारण मार्च महिन्यापासून काजू बियांचे उत्पादन मिळण्यास सुरु होते. पण त्याआधी काजू बागायतीत वाढलेली झाडेझुडपे, तण हटविणे आवश्‍यक असते. ती कामे सध्या सुरु आहेत. या कामासाठी स्थानिक कामगारांची कमतरता भासते.

नवी पिढी अशी कामे करू पाहत नाही, परिणामी कर्नाटक, महाराष्ट्रातून रोजंदारी कामगारांना पाचारण करावे लागते. पुरुष कामगारांसाठी प्रतिदिन ७०० तर महिला कामगाराला ३५० ते ४०० रुपये रोजंदारी द्यावी लागते. बेणकटीचा खर्च वाढत चालल्याने बागायतदारांना काजू पीक घेणे आव्हानात्मक बनले आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही स्थिती बनलेली आहे. त्यामुळे काजू बागायतदारांना दरवर्षी तोट्यातच हंगाम जातो.

रोठा किडीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान...

काजू झाडाच्या खोडाला लागणारी अळी म्हणजे रोठा कीड ही काजू झाड पूर्णपणे नष्ट करते. त्यावर उपाय योजना करण्यासाठी सरकारी पातळीवर कार्यवाही गरजेची आहे. जमिनीत खाली मुळांना, खोडांना किडीची लागण होऊन नंतर झाड मरण पावते. त्यामुळे काजू झाडे नष्ट होत आहेत.

काँग्रेस तण खतरनाकच...!

काजू पिकात मोठ्या प्रमाणावर उगवणारे काँग्रेस गवत काजू उत्पादकांसाठी मोठी डोकेदुखी आहे. हे तण फारच नुकसान करीत असते. ते दरवर्षी बागायतीत पसरत जाते. कितीही काढले तरी ते वाढतच जाते. त्यामुळे काजू रोपांची व्यवस्थित वाढ होत नाही. ते काढण्यासाठी बराच खर्च येतो..

अनुदान आवश्यक...!

बेनकटीसाठी काजू उत्पादकांना अनुदान देण्याची गरज आहे. सध्या तण काढण्यासाठी वा बेनकटीसाठी कोणतीही अनुदान दिले जात नाही.

काजू उत्पादनावर हवामान बदलाचा विपरीत परिणाम

तिसवाडी: हवामान बदल ही वस्तुस्थिती असून गोव्यावर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षी सुमारे ३५ टक्के काजू पिकांचे नुकसान झाले. हिवाळ्यात देखील पाऊस पडू लागल्याने याचा थेट काजू उत्पादन दुष्परिणाम झाला आहे, अशी माहिती कृषी खात्याचे उपसंचालक नागेश कोमरपंत यांनी दै. गोमन्तकला दिली.

नोव्हेंबरपासून काजूच्या झाड्यांना फुले येण्यास सुरुवात होते. यासाठी थंडी आणि उन्ह याची आवश्यकता असते, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये दोन दिवस थंडी पडते आणि नंतर दोन दिवस उन्ह, परिणामी याचा पिकांवर परिणाम होतो. त्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणात पिकांवर याचा वाईट परिणाम झाला आहे, असे कोमरपंत यांनी सांगितले.

आयातीवर अवलंबित्व!

गोव्याची काजू जगप्रसिद्ध आहे. कारण स्थानिक काजूच्या गुणधर्मामुळे मागणीही वाढली आहे. पण मूळात गोव्यातील काजू उत्पादन कमी आहे. त्यात प्रत्येक वर्षी घट होत आहे. कारण येथील काजूवर होणारा पर्यावरणीय आघात मोठा आहे. शिवाय काम करणारे हात कमी होत आहेत. बागायतीत राबणारा मजूर वर्ग कमी आहे.

त्यामुळे नवी लागवड कमी कमी होत आहे. त्यामुळेच प्रक्रिया उद्योगाला खानापूर, बेळगाव, दोडामार्गा परिसरातील काजूवरच अवलंबून राहावे लागत आहे. एकूणच आयात काजूमुळेच गोव्यातील प्रक्रिया उद्योग तरला आहे. त्यामुळे गोव्याची खरे काजू पीक कोणते? हा प्रश्‍नच आहे.

गोमंतकीय काजूगर व शेजारील राज्यातील काजूगरात काहीसा फरकही आहे, तो गोव्याचा काजूगर म्हणून विकला जातो. कोविड काळात बाहेरील काजू व काजू बोंडांची आयात करता येत नव्हती, त्यावेळी येथील काजू उत्पादनावर परिणाम झाला होता.

फेणी उत्पादक बोंडूंसाठी शेजारील राज्यांवर अवलंबून

काजूगरांबरोबरच येथील फेणी उत्पादनही शेजारील राज्यातील काजू बोंडावर अवलंबून आहे. कारण शेजारील प्रदेशात फेणी काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे तेथे फेणी काढली जात नाही. अल्पप्रमाणात चोरट्या मार्गाने थोडी काढली जाते. त्यामुळे शेजारील प्रदेशातील काजूबोंडू मोठ्या प्रमाणात गोव्यात पाठवली जातात. त्याचा त्यांना नफाही चांगला मिळतो. काजू हंगामात चोर्ला घाट, दोडामार्गावर पहाटेपासूनच अनेक वाहने फक्त काजूबोंडांची वाहतूक करतात. हा प्रकार पाहिल्यात प्रत्यक्षात गोव्यातील काजू व्यवसाय कोणत्या काजूवर अवलंबून आहे, हे कळेल.

उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न आवश्‍यक

गोवा व शेजारील प्रदेशाव्यतिरिक्त भागातील काजू उत्पादन जर गोव्याचे नाव वापरून व्यवसाय करीत असतील तर ते चुकीचे असून त्यावर निर्बंध घातले पाहिजेत. त्यासाठी शासनान प्रयत्न करणे गरजेचे आहे. पण गोव्यातील काजू उत्पादन वाढण्यासाठीही कृषी खात्याबरोबरच इतरांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हमीभावामध्ये भरीव वाढ हवी

ग्रामीण भागातील कॅश क्रॉप ऊस पिकांची वासलात लावल्यानंतर खऱ्या अर्थाने काजू पिकाला चांगले दिवस येऊ शकतात, पण स्थिती उलट झाली आहे. पर राज्यातून तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणात काजूबिया तसेच काजूगर राज्यात येत असल्याने गोव्यातील स्थानिक काजू उत्पादकांना योग्य दर मिळत नाही. खुद्द सरकारी काजू बागायतींची निघा राखण्यास सरकार कमी पडत आहे.

एकदा लावलेल्या काजू बागायतींत नवी काजू झाडे लावली जात नाही. किती तरी झाडे रोग लागून, वाऱ्याने उन्मळून पडली आहेत, तरी वन विकास महामंडळ आपल्या बागायतींतील काजू झाडांच्या जुन्या आकडेवरुन बागायतींचा लिलाव करते, परंतु लिलाव घेणाऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यात वन विकास महामंडळाच्या काजू बागायती अभयारण्य क्षेत्राच्या कक्षेत आल्याने महामंडळाने या बागायतींवरील आपला दावा सोडला आहे, त्यामुळे या बागायतींतील पीक वाया जाते. त्यात आता वन विकास महामंडळाच्या काजू बागायतींवर आपला हक्क सांगून वन हक्क कायदा नुसार जमिनी हडप करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT