Bhutani Infra Project|Mauvin Godinho  Dainik Gomantak
गोवा

..माझे नाव घेतल्याशिवाय काहीजणांना झोप येत नाही! 'Bhutani Project' आरोपांवर गुदिन्होंचे उत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bhutani Infra Project Sancoale

वास्को: सांकवाळ येथील भूतानी प्रकल्पाच्या विषयात माझे नाव घेतले जात आहे. प्रत्यक्षात या गोष्टीशी माझा कुठलाही संबंध नाही. मी कशातच नाही, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. काहीजणांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही. माझा भूतानी प्रकल्पाशी कसलाही संबंध नसतानाही काहीजण माझे यात नाव घेत आहेत. कदाचित त्यांना असे करून समाधान मिळत असेल. राज्यातील सरकार कुठलाही विषय सोडवण्यास सक्षम आहे. त्यामुळे याविषयावरही तोडगा काढू, असे त्यांनी सांगितले.

भूतानी प्रकल्पावरून सध्या स्थानिक आमदार तथा मंत्री माविन गुदिन्हो यांच्यावर आरोप होत आहेत. त्यांचाही यात सहभाग असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आता त्यांनी या प्रकल्पाशी आपला कसलाही संबंध नसल्याचे नमूद केले आहे.

सांकवाळ पंचायत क्षेत्रातील सावरकोंड गावातील डोंगराळ भागात प्रमेश कन्स्ट्रक्शन भूतानी इन्फ्रा प्रकल्पाला सांकवाळ ग्रामस्थांबरोबर संपूर्ण गोव्यातून विरोध होत आहे. अखेर भूतानी इन्फ्रा प्रकल्पाला राज्य सरकारलाही विरोध करावा लागला होता.

भूतानीवरुन होणाऱ्या आरोपांनंतर या प्रकल्पाला दिलेली परवानगी तपासली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच सांकवाळ पंचायतीनेही या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

स्थानिकांचा विरोध

सांकवाळ येथील प्रस्तावित भूतानी प्रकल्पाला तेथील स्थानिकांचा मोठा विरोध सहन करावा लागत आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करण्यात आली असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. ही डोंगरकापणी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात 'कायदा सुव्यवस्था' राखण्यासाठी पोलिसांची दिवस-रात्र मेहनत; वाळपई, शिवोलीत 'पडताळणी मोहिम'

का साजरा करतात 'World Heart Day'? हृदयविकारांचे प्रकार आणि 'कोरोना'नंतर वाढलेल्या शस्त्रक्रियांमागची कारणे जाणून घ्या

FC Goa: 'हेर्रेरा'ची सामन्यानंतरही दिलदार कामगिरी! ईस्ट बंगालच्या चाहत्यांप्रती केला 'असा' आदर व्यक्त; म्हणाला की..

Goa Recruitment: सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागात होणार मेगा भरती

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

SCROLL FOR NEXT