Veroda School Crime News Canva
गोवा

Goa Crime: विद्यार्थ्यांच्या भांडणात तिसरीतली विद्यार्थीनी गंभीर जखमी, अत्यवस्थ होऊनही शाळेचे दुर्लक्ष; पालक संतप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Veroda School Crime News

कुंकळ्ळी: वेरोडा येथील एका खासगी अनुदानित प्राथमिक विद्यालयात शिकणाऱ्या तिसरीच्या विद्यार्थिनीला वर्गातीलच काही मुलांनी मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली. मेंदूला मार लागल्याने तिच्यावर गोमेकॉत किचकट शस्त्रक्रिया करण्यात आली.

बाळ्ळी येथील ही विद्यार्थिनी वेरोडा येथील खासगी शाळेत शिकते. शुक्रवारी शाळेत लहान मुलांमध्ये भांडण झाले. त्यावेळी या मुलीचे डोके आपटल्यामुळे तिला जबर इजा झाली. शिक्षकांनी जो निष्काळजीपणा दाखवल्यामुळे मुलीवर गंभीर प्रसंग ओढवल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी करून कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

तोंडातून फेस ; मुलगी अत्यवस्थ

मुलगी जखमी असतानाही शिक्षकांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही. जेव्हा मुलीची आई तिला घरी नेण्यासाठी शाळेत गेली, तेव्हा मुलगी बेशुद्धावस्थेत होती. तिच्या तोंडातून फेस येत होता. एवढे होऊनही शाळेने रुग्णवाहिका बोलाविणे किंवा जखमी मुलीला डॉक्टरकडे नेण्याचे औचित्य दाखविले नाही. मुलीच्या आईने ओळखीच्या माणसाला बोलावून तिला बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

का साजरा करतात 'World Heart Day'? हृदयविकारांचे प्रकार आणि 'कोरोना'नंतर वाढलेल्या शस्त्रक्रियांमागची कारणे जाणून घ्या

FC Goa: 'हेर्रेरा'ची सामन्यानंतरही दिलदार कामगिरी! ईस्ट बंगालच्या चाहत्यांप्रती केला 'असा' आदर व्यक्त; म्हणाला की..

Goa Recruitment: सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागात होणार मेगा भरती

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

Margao News: पावसामुळे कोकण रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब! नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची लोकांची मागणी

SCROLL FOR NEXT