Maruti WagonR 2025  Dainik Gomantak
अर्थविश्व

मारुतीने केला मोठा धमाका! Maruti WagonR 2025 6 एअरबॅग्जसह लॉन्च; जाणून घ्या दमदार फिचर्स, शानदार डिझाइन अन् किंमत

Maruti New Car Launch India: मारुती सुझुकी इंडियाने बहुप्रतिक्षित मारुती वॅगनआर 2025 लॉन्च केली. कंपनीने नवीन वॅगन आरमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे 6 एअरबॅग्ज हा आहे.

Manish Jadhav

Maruti Suzuki WagonR 2025 Launched with 6 Airbags and Enhanced Safety Features

मारुती सुझुकी इंडियाने बहुप्रतिक्षित मारुती वॅगनआर 2025 लॉन्च केली. कंपनीने नवीन वॅगन आरमध्ये अनेक मोठे बदल केले. यातील सर्वात मोठा बदल म्हणजे 6 एअरबॅग्ज हा आहे. यापूर्वी, केवळ 2 एअरबॅग्ज देण्यात आल्या होत्या. 2025 वॅगन आर आता मागील सीटसाठी सेंटर सीटबेल्टसह येते. इतर सुरक्षा फिचर्समध्ये ABS, EBD, ESP, सेंट्रल लॉकिंग आणि रियर पार्किंग सेन्सर्स यांचा समावेश आहे. चला तर मग या कारमध्ये आणखी काय विशेष देण्यात आले आहे ते जाणून घेऊया...

फीचर्स आणि डिझाइन

नवीन मारुती वॅगनआरमध्ये अपडेटेड एक्सटीरियर आणि इंटीरियर डिझाइन आहे, जे केवळ आकर्षकच नाहीत तर आधुनिक गरजा लक्षात घेऊन तयार केलेले आहे. तसेच, इंटीरियर लेआउट अशाप्रकारे डिझाइन केले आहे की, प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येईल. याशिवाय, कारमध्ये (Car) पर्याप्त स्पेस देखील देण्यात आली आहे. चांगले मायलेज आणि उच्च कामगिरी लक्षात घेऊन इंजिनमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. नवीन मॉडेलमध्ये मल्टीमीडिया सिस्टीम, कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि एडवांस्ड इन्फोटेनमेंट सिस्टीम समाविष्ट आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुखासीन होतो.

कारमध्ये काय खास मिळणार?

टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी

4-स्पीकर साउंड सिस्टम

स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स

मॅन्युअल एसी, रिमोट कीलेस एंट्री, रियर वायपर/वॉशर आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMs

इंजिन पर्याय

1.0-लिटर 3-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन

पॉवर: 66 बीएचपी, टॉर्क: 89 एनएम

5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी उपलब्ध

1.0-लिटर पेट्रोल-सीएनजी व्हेरिएंट

पॉवर: 56 बीएचपी, टॉर्क: 82.1 एनएम

5-स्पीड मॅन्युअल

1.2-लिटर 4-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन

पॉवर: 89 बीएचपी, टॉर्क: 113 एनएम

5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी उपलब्ध

अंदाजे किंमत

नवीन वॅगन आर 2025 ची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. तथापि, या कारची किंमत सध्याच्या वॅगन आर पेक्षा जास्त असू शकते. कारची किंमत ₹5.64 लाख (एक्स-शोरुम) आहे. नवीन अपडेट्ससह, 2025 मारुती वॅगन आर ची बेस LXi MT व्हेरिएंटची किंमत ₹5.79 (एक्स-शोरुम) लाखांपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे, तर ZXi+ AGS व्हेरिएंटची किंमत ₹7.355 लाखांपर्यंत जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी रंगणार भारत–पाकिस्तान महामुकाबला! किती वाजता सुरू होणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

Goa Crime: गोव्यात दिवसा चेन स्नॅचिंग… रात्री महाराष्ट्रात पसार! इराणी गँगचा पर्दाफाश, दोघांना अटक

Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

राज्यपालपदाच्या प्रवासासाठी राजकीय प्रवासाला सोडचिठ्ठी; पी. अशोक गजपती राजू यांचा तेलगू देसम पक्षाचा राजीनामा

दो भाई दोनों तबाही! मोठ्याने पदार्पणाच्या सामन्यातच विश्वविक्रम रचला, आता धाकट्याने 'हॅटट्रिक' घेत घातला धुमाकूळ; पाहा Video

SCROLL FOR NEXT